पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ

शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (08:08 IST)
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ (Increase in Uniform Allowance) करण्यात आली आहे. पूर्वी गणवेश भत्ता ५ हजार रुपये होते. गृहविभागाने गणवेश भत्त्यात एक हजारांची वाढ करून सहा हजार रुपये भत्ता केला आहे. यामुळे पोलीस उपनिरिक्षक ते अप पोलीस अधिक्षक या अधिकाऱ्यांना फायदा होणार आहे.
 
पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात गृह विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. पूर्वी पोलिसांना विभागाकडून भत्ता न देता गणवेश दिला जायचा. मात्र, २०२१ मध्ये ती पद्धत बंद करून गणवेश भत्ता देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ५ हजार रुपये गणवेश भत्ता मिळत असे. परंतु, आता या भत्त्यात वाढ करण्यात आली असून सहा हजार रुपये गणवेश भत्ता दिला जाणार आहे.
 
वाढीव अनुदानाचा निर्णय १ जानेवारी २०२३ पासून लागू झाला आहे. त्यामुळे यापुढे गणवेश भत्ता पोलिसांना सहा हजार रुपये मिळणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती