Shivpuri जोडप्यातील प्रेम वाढविणारे भदैया कुंड

गुरूवार, 5 जानेवारी 2023 (22:42 IST)
मध्यप्रदेशातील सिंदीयां राजघराण्याची उन्हाळी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवपुरी येथे भदैया कुंड नावाचे एक ठिकाण आहे. 
 
या कुंडातून पावसाळ्यात मोठा धबधबा वाहतो आणि याचे सौंदर्य अधिकच खुलते. या कुंडाबाबत अशी समजूत आहे की ज्यांच्या वैवाहिक जीवनात सतत भांडणे आणि कलह आहेत अथवा जी प्रेमी युगले ब्रेकअपच्या मनस्थितीत आहेत, त्यांनी येथे येऊन पाण्यात भिजले की त्यांच्यातील भांडणे नाहीशी होतात आणि प्रेम वाढीस लागते. त्यामुळे हे कुंड व धबधबा लव्ह फॉल म्हणून प्रसिद्धीस आला आहे.
 
येथे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरातूनच वाहणार्‍या पाण्यातून हे कुंड बनले आहे. हे कुंड किमान 150 वर्षापूर्वीचे आहे असे सांगतात. पावसाळ्याच्या दिवसात वरील मंदिरातून येणारे पाणी खडकांवरून वाहते व त्यामुळे येथे धबधबा तयार होतो. 
 
या कुंडातील पाणी ऐन उन्हाळ्यातही कधीच आटत नाही. असेही सांगतात की या खडकांवरून पाणी वाहत येते तेव्हा त्यात कांही विशेष खनिजे मिसळतात व त्यामुळे हे पाणी गुणकारी बनते. गृहकलह, नवराबायकोमधील विसंवाद या संदर्भात कुणी पंडिताला प्रश्न विचारला तर ते पंडित, ज्योतिषी या धबधब्यात भिजून या असा सल्ला देतात. 
 
त्यामुळे येथे तरूणतरूणींबरोबरच अनेकदा वयोवृद्ध जोडपीही भिजण्यासाठी आलेली दिसतात. कदाचित या औषधी पाण्यात एकमेकांसह मनमोकळेपणाने केलेली मौजमस्तीच या जोडप्यांच्या चेहर्‍यावर हास्य ङ्खुलविण्यास व मतभेद विसरून जाण्यास कारणीभूत ठरत असावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती