सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या पैकी एक रुग्ण लातूर चा तर एक पुण्याचा आहे. यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून 20 झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटची एकूण 40 प्रकरणे देशभरात आहेत आणि 20 प्रकरणे एकट्या महाराष्ट्रात आहेत. अशाप्रकारे ओमिक्रॉन व्हेरियंटची देशातील निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र आता ओमिक्रॉन व्हेरियंट चाही बालेकिल्ला बनणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. याआधी, दुसरी लाट निर्माण करणाऱ्या डेल्टा व्हेरियंटच्या जवळपास निम्म्या केसेस बऱ्याच काळापासून महाराष्ट्रातून येत होत्या. एवढेच नाही तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला होता.
सध्या देशातील ओमिक्रॉन व्हेरियंटतील एकूण 40 प्रकरणांपैकी 20 प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत, तर राजस्थानमध्ये आतापर्यंत 9 प्रकरणे आढळून आली आहेत. याशिवाय कर्नाटक आणि गुजरातमध्ये 3-3 प्रकरणे आहेत. याशिवाय केरळ, आंध्र प्रदेश आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. राजधानी दिल्लीत सध्या ओमिक्रॉन व्हेरियंटची दोन प्रकरणे आहेत.