फडणवीसांची म्हाडा परीक्षेवरून राज्य सरकार वर टीका

रविवार, 12 डिसेंबर 2021 (16:38 IST)
म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली अशी माहिती दिली. यावरून विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे आता भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. या परीक्षेवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ''मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. सरकारी भरतीचा बट्ट्याबोळ होत आहे आणि राज्य सरकार काहीही बोलायला तयार नाही, !हा भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे ! असं म्हणत फडणवीस यांनी राज्यसरकार वर घणाघाती टीका केली आहे.  परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. असं किती दिवस सहन करायचे आहे. सरकार काहीही बोलायला तयार नाही. आपण कोणाला नोकरी देऊ शकत नाही तर किमान त्यांची अशा प्रकारे थट्टा तरी करू नये. असे फडणवीस यांनी म्हटले  आहे.

आरोग्य भरती परीक्षेचा घोळ!
पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत

आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ!

सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती