दिवाळीत बसमालकांची जबर लुट, पुणे, नाशिक, मुंबईला जाताय हे आहेत दर
दिवाळी आणि सणासुदीच्या दिवसात खाजगी प्रवासी वाहतुकीचे भाडे अव्वाच्या सव्वा होतात. सरकारने इशारा देऊनही या दिवाळीत हे भाडे नेहमीप्रमाणे गगनाला भिडले आहे. लातूर-मुंबई एसी स्लीपरचे तिकीट १८०० ते २००० रुपये आकारले जात आहे. हे तिकीट इतर काळात साधारणत: नऊशे रुपये असते. लातूर-पुणे सध्या एक हजार रुपये आकारले जात आहे. सामान्य काळात ते ६०० रुपये इतके असते. लातूर-औरंगाबादचा स्लीपर प्रवास सध्या ८०० ते ३००० रुपयांपर्यंत पोचला आहे. सामान्य काळात तो पाचशेच्या आसपास असतो. किंगफिशर, विश्व, पुष्कराज, मानसी या गाड्यांना अधिक प्राधान्य दिले जाते. ऑनलाईन बुकींगला कधी दर कमी येतो तेव्हा ऑफलाईन महाग असते. कधी ऑनलाईनला भाव जास्त येतो तेव्हा ऑफलाईन स्वस्त पडते. या घोळात प्रवासी मात्र भरडला जातो. कधी ऑनलाईन करणार्यांना फायदा होतो. तर कधी ऑफलाईनवाल्यांना फायदा होतो. सर्वांनाच ऑफलाईन बुकींग करणे शक्य नसते. तसेच सर्वांनाच ऑनलाईनही शक्य नसते. यात प्रवासी मात्र नुकसानीत जातो.
साधारणत: लातूर-नागपूरचा स्लीपर प्रवास ७०० रुपयांना पडतो. तो या काळात हजार ते बाराशे रुपयांवर पोचला आहे. लातूर-नाशिक तिकीट ७०० रुपयांना मिळायचे ते आता हजारावर पोचले आहे. लातूर-औरंगाबाद तर आठशे रुपये ते तीन हजारापर्यंत पोचले आहे. लातूर-पुणे स्लीपर प्रवास सहाशे रुपयात व्हायचा. या सिझनमध्ये हजार ते तेराशे रुपयावर गेला आहे.
विश्वचे दर सामान्य सणासुदीच्या काळात प्रवासाचे दर वाढवले जातात. विश्वही वाढवते पण त्याचा मोठा फटका बसू नये याची काळजी घेतो असं विश्व ट्रॅव्हल्सचे संचालक सुनील देशपांडे यांनी सांगितलं. औरंगाबादच्या स्लीपरचा दर ४५० असायचा. आता तो केवळ ५५० आहे. मुंबईला स्लीपरने जाण्यासाठी ८०० रुपये आकारले जायचे. या सिझनमध्ये एक हजार रुपये आकारले जातात. पुण्याला सामान्य काळात स्लीपरचा भाव ६०० होता. आता तो ९०० रुपये आहे.