पुण्यात जोरदार पाऊस, परतीचा पाऊस नाही हे आहे त्याचे कारण

मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (15:11 IST)
राज्यभर परतीच्या पावसाचं जोरदार हजेरी लावली आहे. आधी  मुंबईत रात्री तासभर जोरदार पाऊस झाला. तर दुसरीकडे पुण्यात ऐन पावसाळ्याप्रमाणे रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचले आहे. पुण्यातील बी टी कवडे रोडवर तारादत्त कॉलनीत पावसाचं पाणी तुंबलं असून त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे. या रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने घरात इतकं पाणी साचलं की एखादा ओढा वाहतोय की असे चित्र दिसत होते. घरात पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू पाण्यात तरंगत होत्या. दुचाकी, चारचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या आहे. 
 
मात्र पडणारा पाऊस हा परतीचा नसून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस आला असून, असं हवामान तज्ञ शुभांगी भुते यांनी स्पष्ट केले आहे.  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने, महाराष्ट्रात वीजांचा कडकडाट करत संध्याकाळी पाऊस होतो आहे. तर कमी दाबाचा पट्टा काही दिवस तसाच राहणार आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत पाऊस मेघगर्जनेसह होईल, मग या महिन्याच्या अखेर पाऊस कमी होईल, असं शुभांगी भुते यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती