गोंदिया जिल्ह्यात कोविड लसीकरणाचे प्रथम डोसचं प्रमाण 89 टक्के आहे. अजूनही जिल्ह्यात 11 टक्के पात्र नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचं प्रमाण 100 टक्के होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात पाठवावं.
ज्या अधिकारी, कर्मचार्यांचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सादर होणार नाही, त्यांचे डिसेंबर वेतन देण्यात येणार नाही. यासंदर्भातचं पत्र जिल्हाधिकार्यांनी जारी केलं आहे.