मविआ सरकार असते तर वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणलाच असता, असं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तळेगावात केलं. चाळीस आमदारांसोबत मीही राजीनामा देतो, सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाऊ, असं आव्हानही शिंदे गटातील आमदरांना आदित्य ठाकरेंनी दिले.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही, केंद्राला किंवा गुजरातला दोष देत नाही, हा दोष खोके सरकारचा आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. सध्या राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत ऩाही.