हृदयद्रावक ! लग्ना आधीच नवरीच्या 3 भावांचा अपघातात दुर्देवी मृत्यू

Webdunia
रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (14:27 IST)
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात लोसल पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी झालेल्या भीषण अपघातात बहिणीच्या लग्नात व्यस्त असलेल्या तीन भावांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. 
 
शनिवारी मध्यरात्री हा अपघात घडला असून एका कारमधून बहिणीच्या लग्नाची तयारी करत असलेले चार तरुण कामा निमित्त जात असताना कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खांब्याला जाऊन धडकली आणि कारचा अपघात झाला .या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले तर चौथ्या तरुणाचीअवस्था गंभीर आहे.. या अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळाची पोहोचली आणि  मृत आणि जखमींना रुग्णालयात पाठविले.डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. अपघातात शिशराम ओला, धर्मेंद्र जाट, लोकेश जाट असे मृत झाले आहे. तर नवरीचा चुलत भाऊ सुनील जाट हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.     

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख