पाकिस्तानमध्ये तब्बल १८ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर २६ जानेवारीला भारतात परतलेल्या ६५ वर्षीय हसीना बेगम यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या औरंगाबादच्या रशदपुरा येथील रहीवासी होत्या. त्यांची नमाजे जनजा रशीदपुरा येथील मोहंमदीया मस्जिद मध्ये नमाज जोहरमध्ये अदा करण्यात आली. मायदेशी परतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आहे. मायभूमीत अखेरचा श्वास घेवून त्यांनी जगातून निरोप घेतला. औरंगाबाद येथील पीरगैब कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांना वारस नसल्याने नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी दफनविधी केले.