गडचिरोली जिल्ह्यातील कोरची मुख्यालयापासून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरवीदंड येथे हा प्रकार घडला आहे. शिक्षक सुशील आडीकने या शिक्षकाने चक्क रोजंदारी विद्यार्थीनीला आपल्या जागी शिकविण्यासाठी ठेवल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरवीदंड येथे वर्ग 1 ते 5 पर्यंत वर्ग असून यामध्ये एकूण 16 विद्यार्थी आहेत. परंतु शिक्षक हे शाळेत येतच नाही. तर, मग येथे विद्यार्थी शिकतील कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.