स्वागतासाठी फुलांची उधळण करताना अपघात, 4 कार्यकर्ते खाली पडून गंभीर जखमी

सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (20:22 IST)
मराठा आरक्षणासाठी अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारे जरांगे पाटील यांच्या नाशिकमधील येवला शहराच्या सभेआधी त्यांच्या स्वागतासाठी फुलांची उधळण करताना जेसीबीच्या बकेटमधून कोसळल्याने कार्यकर्ते जखमी झाले. सर्वाना जबर मार बसला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
 
मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी छगन भुजबळांच्या मतदारसंघात जाहीर सभा संपन्न  झाली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित लावली.  याच दरम्यान सदरची अपघाताची घटना समोर आली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांचे जेसीबीवरुन फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. यासाठी जवळपास 15 ते 16 जेसीबी स्वागतासाठी उभे होते. या जेसीबीमध्ये काही कार्यकर्ते पुष्पवृष्टीसाठी सज्ज झाले असतांनाच जेसीबीच्या बकेटवरील ऑपरेटरचे नियंत्रण सुटल्याने 4 कार्यकर्ते खाली पडून गंभीर जखमी झाले. या कार्यकर्त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतरही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही, जरांगे पाटलांचे आगमन होताच पुन्हा पुष्पवृष्टी केली गेली.





Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती