पुन्हा एकदा नागपूर शहरातील आणखी एका व्यावसायिकाचा जीव एका वैमनस्यातून गेला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी संध्याकाळी 6 वाजता कपिल नगरमध्ये शिवाजी चौकाजवळ म्हाडा क्वार्टर्ससमोरील पान स्टॉलजवळ घडली. शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अंकुश रामाजी कडू (54 ) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. ते जमीन विक्रेता होते.
पानाच्या दुकानाजवळ अंकुश यांची दुचाकी हल्लेखोराने थांबवली आणि अंकुशवर चाकू आणि तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या केली. हल्ल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला. अंकुश यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून, त्याचा दुसऱ्या एका व्यावसायिकाशी वाद सुरू होता, ज्याने त्यांना 'बघून घेण्याची' धमकी दिल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच कपिल नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी सतीश आडे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. आरोपींनी अंकुश यांची हत्या का केली. पोलीस तपास करत आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.