गेली अनेक वर्षे आपण विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असला तरी, आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया बाळाराम पाटील यांनी दिली. ते आरएनओशी बोलत होते. विवेक पाटील यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना बाळाराम पाटील म्हणाले, आज सकाळीच मला विवेक पाटील यांच्या पत्राची माहिती मिळाली. त्या पत्रावरील सही निश्चितपणे विवेक पाटील यांचीच आहे. हा निर्णय घेत असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षातील सर्व सहकार्यांच पत्राद्वारे आभार व्यक्त केले आहेत.