16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना नोटीस

शुक्रवार, 14 जुलै 2023 (21:48 IST)
16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना  सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी त्यांना दोन आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली.यावर कोर्टाने नोटीस बजावली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं होतं. या सुनावणीला आता दोन महिने झाले आहेत. 11 ऑगस्टला याचा निकाल लागू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाने आतापर्यंत तीन वेळा अध्यक्षांची भेट घेऊन निर्णय लवकर घेण्याची विनंती केली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी पार पडली. अध्यक्षांना तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती या याचिकेमध्ये करण्यात आली होती.
 

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती