दुसरे पाकिस्तान बनवू इच्छित संजय राऊत आणि राहुल गांधी, माजी काँग्रेस नेत्याचा मोठा आरोप

सोमवार, 17 मार्च 2025 (15:02 IST)
काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम पक्ष सोडल्यापासून काँग्रेसला आणि राहुल गांधी यांचावर हल्लाबोल करत आहे. त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे राहुल गांधी आणि शिवसेना यूबीटीचे नेते संजय राऊतांवर हल्ला बोल केला.संजय राऊत आणि राहुल गांधी भारताला तोडून दुसरं पाकिस्तान निर्माण करू इच्छित असल्याचा आरोप कृष्णम यांनी केला आहे. 
ALSO READ: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली
राहुल गांधी आणि संजय राऊतांवर हल्ला करत त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचाही उल्लेख केला.ते म्हणाले, जिन्ना यांनी 1947 मध्ये भारत तोडण्याचे स्वप्न पहिले होते. आता संजय राऊत राहुल गांधी यांच्यसह तेच स्वप्न पाहत आहे. 
ALSO READ: महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली
आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, संजय राऊत राहुल गांधींसोबत हा देश तोडण्याचा कट रचत आहे. कारण त्यांना माहित आहे की , भारतातील लोकांना त्यांचे हेतू समजले आहे. आणि त्यांना कधीही पाठिंबा मिळणार नाही. म्हणूनच त्यांना दुसरे पाकिस्तान बनवायचे आहे. ते राहुल गांधी यांना दुसऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान बनवायची इच्छा आहे. असा मोठा आरोप केला.
 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: VHP आणि बजरंग दलाच्या मागण्यांवर रामदास आठवले म्हणाले 'औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा काही फायदा नाही'

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती