पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल राजेंद्र बुंदेले आणि तिची मैत्रीण वैष्णवी विष्णू थोरात या दिवाळीच्या दिवशी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होत्या. मागून येणाऱ्या एका वेगाने येणाऱ्या बोलेरो गाडीच्या चालकाने दोन्ही तरुणींना धडक दिली आणि घटनास्थळावरून पळून गेला.