मुंबई पश्चिमेकडील उपनगरातील जोगेश्वरी येथील एका बहुमजली व्यावसायिक इमारतीत गुरुवारी सकाळी आग लागली. गांधी शाळेजवळील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये सकाळी १०:५० वाजता लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर अनेक लोक इमारतीत अडकले होते, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.