मिळालेल्या माहितीनुसार पाच विधान परिषदेच्या जागांसाठी २७ मार्च रोजी पोटनिवडणुका होणार आहे. या पाच जागांपैकी भाजपला तीन जागा मिळाल्या आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय खोडके यांना संधी दिली आहे. संजय खोडके हे अजित पवारांचे जवळचे मानले जातात. संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके अमरावती मतदारसंघाच्या आमदार आहे. त्यामुळे आता पती-पत्नी आमदार म्हणून एकत्र दिसतील. अशी माहीत समोर आली आहे.