मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या अखेरीस विधान परिषदेच्या पोटनिवडणुका होणार आहे. आज म्हणजेच सोमवारी शिवसेनेने विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराचे नावही जाहीर केले आहे. २७ मार्च रोजी होणाऱ्या राज्य विधान परिषदेच्या पाच जागांच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२५ आहे. तसेच उमेदवारी अर्जांची छाननी करण्याची शेवटची तारीख १८ मार्च आहे, तर उमेदवार २० मार्च रोजी आपली नावे मागे घेऊ शकतात.