तसेच विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आज म्हणजेच गुरुवारी सकाळी ११:३० वाजता आपला अर्ज दाखल करतील. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि रामगोपाल यादव यांच्यासह इंडिया ब्लॉकचे अनेक नेते उपस्थित राहतील. ८० विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रस्तावक आणि समर्थक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये सोनिया गांधी यांचे नावही समाविष्ट आहे.
विरोधी पक्षाकडून बी सुदर्शन रेड्डी यांचा सन्मान
नामांकनापूर्वी बी सुदर्शन यांनी विरोधी आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. इंडिया अलायन्सने संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये बी. सुदर्शन रेड्डी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता जिथे सर्व मोठे विरोधी नेते आणि मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत यांसारखे फ्लोर लीडर उपस्थित होते.