मलेशियात अडकलेले नाशिकचे पंधरा पर्यटक अखेरी नाशिकमध्ये सुखरूप परतले

मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (07:48 IST)
ठकबाजीमुळे मलेशियात अडकलेले  नाशिकचे पंधरा पर्यटक अखेरी नाशिकमध्ये सुखरूप परतले. नाशिकचे खासदर  हेमंत गोडसे यांच्या मध्यस्तीनंतर केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मलेशिया एम्बेसी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत मलेशिया पोलिसांच्या कस्टडीतून पंधरा पर्यटकांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले.
 
नाशिकमधील सुभाष ओहोळे, मिनाक्षी ओहोळे, अरूण भदरंगे, शांताबाई भदरंगे,धनाजी जाधव,सुनिल म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव,विमल भालेराव,मंदा गायकवाड,वृशाली गायकवाड,प्रविण नुमाळे,द्रोपदी जाधव,इंदूबाई रूपवते हे सर्व नाशिक  शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंट मार्फत मलेशिया येथे गेले होते.   हैदराबाद येथून चार जणांच्या विसाचे काम पूर्ण करून मलेशियाला येतो असे सांगून एजन्ट मलेशियात पोहोचलाच  नाही. त्यामुळे पर्यटक तेथे चिंतेत असतानाच  मलेशिया पोलिसांनी त्यांना हटकावले. आणि या सर्वांचे पासपोर्ट जप्त करून घेत त्यांना ताब्यात घेतले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती