याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथील सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत शेतातील गोठ्यावर राहत होता. पती-पत्नींना तीन मुली असून, सुरेश हा नेहमी कावेरीच्या चारित्र्यावर संशय घेत असे यातूनच दोघांमध्ये नेहमी वाद व भांडण होत असत
सुरेशला दारूचे व्यसन असल्याने, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी दिराला हकिकत सांगितली. गावातील नागरिक शेताकडे गेले असता चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली असता ही हकीकत त्याने स्वतः सांगितली. याबाबतची माहिती रिसोड पोलिसांना दिली. रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून, आरोपी पिता सुरेश घुगे यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.