मंत्री पदाची पर्वा नाही’, ‘उद्याच राजीनामा देतो’; राज्यमंत्री बच्चू कडूंचे मोठे विधान

शनिवार, 12 मार्च 2022 (08:09 IST)
अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणालाराज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. आठ दिवस उलटूनही उपोषणाची कोणी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी (Farmer Protest) संताप व्यक्त केला, तर शेतकऱ्यांप्रती आक्रमक होणारे बच्चू कडू  यांनीही या उपोषणाला पाठ फिरवली असा आरोप होत होता. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना बच्चू कडू यांनी ‘तुमची इच्छा असेल, तर उद्याच मंत्री पदाचा राजीनामा देतो’, ‘मंत्री पदाची काही पर्वा नाही’, असे ते म्हणाले आहेत.
 
विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती  जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या आठ दिवसापासून प्राणंतीक उपोषण करत आहे. रात्री भरपावसात या उपोषणाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. आठ दिवस उलटूनही उपोषणाची कोणी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी (Farmer Protest) संताप व्यक्त केला आहे, तर शेतकरी नेते असलेले व शेतकऱ्यांप्रती आक्रमक होणारे बच्चू कडू  यांनीही या उपोषणाला पाठ फिरवली असा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे थेट राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती.
 
यावर बच्चू कडू यांनी उपोषणाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला तर तुम्ही इथं माझ्या राजीनामासाठी बसले का? की न्यायासाठी हे बरोबर नाही ‘तुमची इच्छा असेल, तर उद्याच मंत्री पदाचा राजीनामा देतो’, ‘मंत्री पदाची काही पर्वा नाही’, ‘बच्चू कडू सर्वांचा बाप आहे’ असेही कडू म्हणाले आहेत.
तर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यां संदर्भात 16 तारखेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असून यात या उपोषणावर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती बच्चू कडू
यांनी यावेळी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती