Farmers Protest : मंत्रालयात शेतकऱ्यांचं आंदोलन, सुरक्षा जाळ्यांवर उड्या मारल्या

मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (17:47 IST)
Farmers Protest :अमरावती जिल्ह्याच्या अप्पर वर्धा धरणग्रस्त विरोधी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात  आक्रमक होऊन मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर उडी मारून आंदोलन केले. हे आंदोलन धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी घेऊन केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी 12 ते 15 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात पाठविले आहे. या शेतकऱ्यांनी उद्या पर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आत्महत्याचा इशारा दिला आहे. 

हे शेतकरी अमरावती हुन आले असून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी भागात अप्पर वर्धा धरण आहे.या धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत सरकार गांभीर्याने विचार करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून गेल्या 103 दिवसांपासून हे शेतकरी मोर्शीच्या तहसीलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहे. आज शेतकऱ्यांनी मंत्रालयात आक्रमक आंदोलन केले.103 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषण संदर्भात सरकारने आमच्याशी योग्य चर्चा करावी. अन्यथा आम्ही या पेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागविण्याचे काम आम्ही करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
 


Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती