फडणवीस यांनी सूचक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे सरकारवर टीका

Webdunia
शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (13:59 IST)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांमध्ये थेट महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. “मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं हे आम्ही पाहिलं आहे. त्यांचे साथीदार अजूनही जेलमध्ये बसले आहेत, ज्यांना मंत्री बनवलं गेलं”, असं ते म्हणाले.
 
“सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. रात्री २ वाजता सर्वोच्च न्यायालय उघडलं. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली आणि त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी दिली गेली. हे प्रतिमा संवर्धन कुणाच्या काळात झालं, हे तुम्हाला माहिती आहे”, अशा सूचक शब्दांत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख