हवामानातील बदल मुळे रविवारी पाकिस्तानातून येणारे धुळीचे वादळ गुजरात आणि अरबी समुद्रात पोहोचले. पुणे, मुंबई आणि उत्तर कोकणात धुळीच्या वादळासह ढगाळ वातावरण दिसून येत आहे. IITM SAFAR ने पुणे आणि मुंबईत धुळीचे प्रमाण वाढल्याचे सांगितले आहे.
शहरात आणि परिसरात काही ठिकाणी दुलीचं वादळ असल्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. वाऱ्याचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे होता. वाऱ्याचे वेग 20 ते 25 किलोमीटर ताशीच्या वेगाचे होते. रविवारी पुण्यात तापमान 17.2 अंश सेल्सिअस आणि कमल तापमान 25 अंश सेल्सिअस नोंदले गेले. धुळीच्या वादळामुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढले आहे.