MPSC पूर्व परीक्षेचा पेपर फुटला?

रविवार, 23 जानेवारी 2022 (17:19 IST)
राज्यात आज राज्यसेवा पूर्व परीक्षा MPSC 2021 पार पडत आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थी करत आहे. याचा निषेध म्हणून नागपुरात विद्यार्थी आंदोलन करत आहे. मात्र पेपर फुटल्याचा वृत्ताचे राज्यलोक सेवा आयोगाने खंडन केले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने भाग घेतला आणि लिपिक आणि केंद्रप्रमुख लिपिकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे. 
 
आज सकाळी पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एका विद्यार्थ्याने पेपर दाखवला आहे. माध्यमांशी बोलताना एका विद्यार्थ्यांनी सांगितले की पेपर फुटला तेव्हा केंद्रावर कोणीही नव्हते. केंद्राचे प्रमुख देखील नसल्याचे त्याने सांगितले. मला पेपर पारदर्शक कागदात दिसल्यावर शंका आली. मी ह्याची माहिती खाली येऊन मोबाईलने अभाविप ला दिली. 
 
आजच्या MPSC चा पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचे लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. अशी कोणतीही घटना घडली नाही. असे स्पष्टीकरण राज्य लोकसेवा आयोगाने दिले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती