नाशिकच्या सुपुत्राला वीर मरण

रविवार, 23 जानेवारी 2022 (10:52 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया 
बिहार मध्ये नेपाळ सीमेजवळ बीरपूर येथे शुक्रवारी घडलेल्या अपघात तीन जवानांचा मृत्यू झाला .या अपघातात 10 जवान गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प मध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकाचे प्रशिक्षण सुरु असताना 11 KV उच्च दाब प्रवाहाचा तारेचा धक्का लागून तीन जवानांचा मृत्यू झाला. या जवानांमध्ये नाशिकच्या बोलठाण तालुका नांदगाव चे अमोल हिंमतराव पाटील यांचा समावेश आहे. या अपघातात 10 जवान गंभीररीत्या जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
अमोल हे बोलठाण गावातील असून सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा दलात सामील झाले. अमोल हे  दिवाळीत एका गोंडस मुलीचे पिता झाले असून ती चिमुकली आता सहा महिन्याची आहे. अमोल च्या निधनाची बातमी येतातच गावात शोककळा पसरली आहे. अमोल यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्याची चिमुकली, आई  अविवाहित भाऊ असा परिवार आहे . अमोलचे पार्थिव गावात आणणार असून त्यांच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार केले जाणार. 
 
प्रशिक्षण मैदानात उभारलेले उच्चदाबाच्या प्रवाहाचे विजेचे खांब काढण्यासाठी सीमासुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी वीज विभागाला अनेकदा पत्र लिहिले तरीही कोणतीही दखल घेतली नाही. या दुर्लक्षतेमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती