तुळजाभवानी मंदिरातील 11 पुजाऱ्यांना गैरवर्तन केल्याची शिक्षा म्हणून त्यांना मंदिरात प्रेवश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या वर ही बंदी एक ते तीन महिन्या पर्यंतची घालण्यात आली आहे. मंदिर संस्थानाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांनी या 11 पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंद करण्याची कडक कारवाई केली आहे. या पुजाऱ्यांवर गाभाऱ्यात प्रवेश बंदी असून अनधिकृत प्रवेश करणे, गाभाऱ्यात फोटो काढणे, गैरवतर्न करणे, भाविकांना मंदिरात शिरवणे, सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालणे या कारणांवरून प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. एकाएकी केल्या जाणाऱ्या या कारवाईमुळे पुजाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यांच्यासह इतर पुजाऱ्यांनाही नोटीस पाठविले आहेत. या पुजाऱ्यांच्या विरोधात गैरवर्तन करण्याचा तक्रार मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.