दसऱ्याला म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत निघणार

मंगळवार, 27 जुलै 2021 (15:58 IST)
तब्बल दोन वर्ष रखडल्यानंतर म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. यंदा दसऱ्याला म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत निघणार आहे.म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे ९ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. २०१८ मध्ये ९ हजार १८ घरांसाठी सोडत निघाली होती. मात्र आता मुंबई लगतच्या भागांत परवडणारी घरं घेण्याचे अनेकांचं स्वप्न साकार होणार आहे.पंतप्रधान आवास योजनेतील ६ हजार ५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील २ हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे.
 
म्हाडाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,अत्यल्प,अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील.मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर,विरारमधील बोळींज,कल्याण,वडवली,आणि ठाण्यातील गोठेघर या ठिकाणी ही घऱं उपलब्ध असतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती