पोलिस भरती प्रक्रियेत डमी परीक्षार्थी ; वैजापूर तालुक्यातील 5 तरुण अटकेत

शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (08:22 IST)
नागपूर व पिंपरी चिंचवड येथील पोलिस दलातील भरती प्रकरणात बनावट परीक्षार्थींचे रँकेट वैजापूर तालुक्यातून होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.नागपूर व पिंपरी चिंचवड पोलिसांनी संजरपूरवाडी व तराटयाची वाडी या ठिकाणाहून परीक्षेचे रँकेट चालवणा-या सुशिक्षित तरुणांची टोळीचा पर्दाफाश केला आहे.
 
पोलिस भरती परीक्षेत मूळ परीक्षार्थींकडून १३ लाखाच्या आर्थिक मोबदल्यात लेखी व मैदानी परीक्षा उत्तीर्ण करुन देण्याची हमी या टोळीकडून दिली जात होती.नागपूर येथे ऑगस्ट २०२१ मध्ये पार पडलेल्या परीक्षे दरम्यान उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचे ऑनलाईन तपासणीत हालचाल व त्यांचे चित्रण संशयास्पद आढळून आल्यामुळे या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांनी सुरु केला होता.यातील वैजापूर तालुक्यातील  संजरपूरवाडी येथील जयलाल कारभारी कंकरवाल वय २२ याला नागपूर व वैजापूर पोलिसांच्या पथकाने अटक केली.तसेच त्यांचे साथीदार अर्जुन चुडामण जारवाल यांना पोलिस अटक करण्यासाठी आल्याचे कळल्या नंतर ते पसार झाले.पिंपरी चिंचवड येथील पोलिस भरती परीक्षेत गैरप्रकार करणारे चरणसिंग मानसिंग काकरवाल, किशन सिताराम जोनवाल यांचा मागावर पोलिस पथक वैजापूरात दाखल झाले आहे.
 
बायोमेट्रिक यंत्र पडताळणीत आरोपी निश्चित झाले.पोलिस भरती प्रक्रियेत परीक्षार्थीं विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रात प्रवेश दरम्यान बायोमेट्रिक प्रणाली यंत्राद्वारे हाताचे ठसे नोंदविले जातात तशीच प्रक्रिया मैदानी चाचणी परीक्षे दरम्यान घेतली जाते.ऑनलाईन इन
 
कँमे-याच्या निगराणी पुर्ण परीक्षा प्रक्रिया घेतली गेली.तथापि परीक्षेत गैरप्रकार करण्यात आलेल्या सराईत आरोपींना पोलिसांना गुंगारा दिला.लेखी परीक्षेसाठी मुळ परीक्षार्थींच्या जागेवर दुसराच परीक्षार्थीं व मैदानी चाचणीत असे बनावट परीक्षार्थीं बसवण्याचे कारस्थान यशस्वी केले होते.पोलिसांच्या पडताळणीत त्यांचे बिंग फुटले.आरोपीच्या शोधात आलेल्या पोलिसांनी परीक्षा दरम्यान वापरलेली बायोमेट्रिक यंत्र आणून त्यावर संशयित आरोपीच्या ठसे पडताळणीत आरोपी निश्चित झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती