उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंबाबत भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट

शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (08:16 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी भाजपचे सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांना पोलिसांनी नोटीस बजावली.
 
त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही करण्यात आली. जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले आहेत. या ट्विटवरुन आता सायबर सेल विभागाने जितेन गजारिया यांना नोटीस पाठवली असून त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं. या ट्विटसोबतच जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्विट केलं आहे. आता या ट्विटमागे आणि त्यामधील मजकूरामागे काय हेतू होता याबद्दल पोलीस चौकशी करत असून गजारिया यांचा जबाब नोंदवला.रश्मी ठाकरे मुख्यमंत्री असतील तर मी काय……. करण्यासाठी आहे आहे असं आक्षेपार्ह ट्वि जितेन गजारिया यांनी केलं होतं. हे ट्विट आता डिलिट
 
करण्यात आले आहेत. मात्र या आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी जितेन गजारिया यांच्यावर कारवाई झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती