याबाबत सविस्तर वृत्त असे की, सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे स्कूल ऑफ आर्टिलरीच्या अधिकाऱ्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात माहिती दिली की,
वरिष्ठांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे तत्काळ पोहोचून दोन्ही संशयित इसमांकडे तब्बल दोन तास सखोल चौकशी केली. यावेळी या संशयितांकडे आर्मी असे इंग्रजीत लिहिलेली एक मोटार सायकल आणि महिंद्रा कंपनीची एक जीप मिळून आली. तसेच त्यांच्या जवळ आर्मीचा सिम्बॉल असलेले आयडी कार्डचे कव्हर ज्यामध्ये एक्स इंडिअन आर्मी सिक्युरिटी सर्व्हिसेस, महाराष्ट्र असे लिहिलेले ओळखपत्र आणि आर्मीचे जवान वापरतात तशी पॅन्ट आणि बूट आढळून आले.
त्यांच्याकडे पोलिसांनी व आर्मीच्या अधिकारी यांनी केलेल्या अधिक चौकशीत त्यांची नावे: मोहम्मद असद मुजीबुल्लाहखान पठाण आणि आफताब मन्नत शेख उर्फ मेजर खान अशी असल्याचे समजले. मात्र त्यांनी ही ओळखपत्र कोठे आणि का बनविली याबाबत त्यांनी अजूनही समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे.