डॉ. भारती पवार खासदार आणि राज्य आरोग्य मंत्री ह्या गेल्या काही दिवसा पासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या काळात त्यांनी अनेक जिल्ह्यात जाऊन कोरोनाची आढावा बैठक घेतली होती. लसीकरणा बाबत जनजागृतीसाठी ग्रामीण भागात अनेक कार्यक्रम घेतले. दोन दिवसापूर्वी १५ ते १८ वयोगटातील लसीकरण केंद्राचे उद्घाटन त्याच्या हस्ते करण्यात आले होते. बुधवारी ५ जानेवारी ला त्यांचा मुंबई दौरा होता. या दौऱ्याला नाशिकहून मुंबई ला जात असताना त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचा संशय आल्याने त्यांनी ताबडतोब तपासणी करून घेतली.