पतीशी वाद झाल्याने मुलीचा गळा आवळून आईनेच खून केला

बुधवार, 22 मे 2024 (18:42 IST)
महाराष्ट्रातील नागपुरात पती सोबत भांडण झाल्यामुळे एका महिलेने आपल्या 3 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर हत्या केल्यानंतर ती सुमारे 4 किमी मुलीच्या मृतदेहा सोबत फिरत होती. नंतर तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
सदर घटना सोमवारची आहे. आरोपी महिला आणि तिचा पती हे चार वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने शोधात नागपुरात आले. महिलेचा पती एका पेपर कंपनीत कामाला होता.ते दोघे आपल्या 3 वर्षाच्या मुलीसह एमआयडीसी परिसरात हिंगणा रोड वरील कंपनीच्या आवारात एका खोलीत राहत होता.त्या दोघांमध्ये नेहमीच वाद आणि भांडण होत होते . 

सोमवारी देखील संध्याकाळी त्यांच्यात भांडण झाले आणि त्यांची 3 वर्षाची मुलगी वादामुळे रडू लागली. रागाच्या भरात येत महिलेने मुलीला घराबाहेर काढले आणि तिचा झाडाखाली गळा आवळून खून केला. 
त्या नंतर ती मुलीचा मृतदेह घेऊन इकडे तिकडे फिरत असताना पोलिसांच्या वाहनाला थांबवून तिने घटनेची माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की पोलिसांनी मुलीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

एमआयडीसी पोलिसांनी महिलेला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे.
महिलेला नंतर न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून तिला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 
 Edited by - Priya Dixit     
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती