पुण्यातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला धडक दिली त्यात एक तरुण आणि एका तरुणीचा दुर्देवी अंत झाला या प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक केली. नंतर त्याला जामीन देण्यात आला. या घटनेपासून आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील पसार झाले असून त्यांना छत्रपती संभाजी नगर मधून अटक केले आहे. अल्पवयीन मुलाचे वडील पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये रविवारी पहाटे 'पोर्श' या आलिशान कारने दुचाकी स्वरांना उडवले त्यात अभियंता अनीस अहुदिया (24) आणि अभियंता अश्विनी कोस्टा (24) यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी पीडित दोघेही दुचाकीवरून मित्रांसोबत पार्टीवरून परतत होते. या अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा आहे. त्यालाही पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. पण अल्पवयीन असल्याने काही तासांतच बाल न्याय मंडळाने त्याला निबंध लिहिणे आणि वाहतूक नियम वाचणे अशा किरकोळ अटींवर जामीन मंजूर केला. त्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली.