अमरावतीत दारुड्या शिक्षकाचा शाळेत धिंगाणा! व्हिडीओ व्हायरल!

शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (13:02 IST)
अमरावतीच्या मेळघाटमध्ये शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या ठिकाणी एका शाळेत मद्यधुंद शिक्षकाचे वर्तन दखवत आहे. या व्हिडिओंमध्ये एका जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक चक्क दारू पिऊन वर्गात झोपला आहे. आणि वर्गात विद्यार्थी मस्ती करत आहे. हा धक्कादायक प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या केमेऱ्यात  कैद केले असून हा व्हिडीओ अमरावतीत व्हायरल झाला आहे. हा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील धारणी तालुक्यातील काकरमल येथील एका जिल्हापरिषद शाळेचा आहे.  
 
व्हायरल व्हिडीओमध्ये एक शिक्षक वर्गात झोपलेला आहे. त्याचे पाय टेबलावर आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या शिक्षकाला कशाचच भान नाहीये. त्याने पॅण्टमध्येच लघुशंका केली . 
 
ज्याने हा व्हिडीओ बनवला त्याने शिक्षकाला जाग करून विचारपूस असतं असता हा शिक्षक वर्गातून हालत डुलत बाहेर पडतो. वर्गातील विद्यार्थ्यांना या बाबत विचारपूस केली  असता सर सकाळीच शाळेत दारू पिऊन आल्याचे सांगितले. दारु पिऊन शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांसमोरच विचित्र अवस्थेत झोपी गेलेल्या या शिक्षकावर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे. 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती