आपल्या भाषणातून राजकीय टोलेबाजी करत दीड महिन्यांपूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली होती, असं विधान केलं आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख हा शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीकडे होता. त्यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह १२ खासदार फोडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.
“दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली होती” या एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, “ही जी दहीहंडी आहे, ती बघायला किमान १५ ते २० हजार लोकं याठिकाणी जमले आहेत. सगळ्यांच्या समोर ही दहीहंडी फुटत आहे. पण एकनाथ शिंदे यांनी फोडलेली दहीहंडी ही गुप्तपणाने, चोरून कुठेतरी जाऊन फोडलेली आहे. त्याला महाराष्ट्राची अजून मान्यता नाही, त्यामुळे ती काही खरी दहीहंडी नाही” असं विधान जयंत पाटलांनी केलं आहे. ते पुण्यातील धायरी याठिकाणी रुपाली चाकणकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं आहे.