दौंडमधील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र आल्याने सर्वांचे लक्ष या कार्यक्रमाकडे होते. यावेळी पवार काका-पुतण्यात संवाद होणार का, याचीही उत्सुकता होती. परंतु व्यासपीठावर दोघेही अंतराने बसले. दोघांच्याही खुर्च्या जवळ लावल्या होत्या. परंतु अजित पवारांनी नेमप्लेट बदलून दोन खुर्च्या दूर बसले. प्रथम अजित पवारांचे भाषण झाले. त्यानंतर शेवटी शरद पवारांचे भाषण झाले आणि त्यांचे भाषण संपताच अजित पवार तेथून तडकाफडकी निघून गेले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा कायम असल्याची चर्चा रंगली.
दौंड येथील संस्थेच्या कार्यक्रमात राजकीय मतभेद बाजूला सारून पवार कुटुंबीय एकत्र आले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर पवार कुटुंब पहिल्यांदाच स्वत:च्या संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळाले. या निमित्ताने पवार कुटुंबियांनी अनेक आठवणी आणि किस्से सांगितले. तसेच संस्थेमार्फत सुरू असलेल्या कामांचा पाढा वाचला. यावेळी सगळ््यात जास्त लक्ष शरद पवार आणि अजित पवारांच्या भाषणाकडे होते. मात्र, दोघांनीही राजकीय भाषण टाळले.