धनंजय मुंडे यांची आमदारकी जाईल, करुणा शर्मा यांनी केले भाकीत
शनिवार, 15 मार्च 2025 (17:06 IST)
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा यांनी भाकीत केले आहे त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांची मंत्रिपदाची खुर्ची गेली आता आमदारकी जाईल. त्या म्हणाल्या, मी सांगितले होते की त्यांना मंत्रिपद गमवावे लागणार आणि ते खरे झाले. आता त्यांना आमदारकी देखील गमवावी लागणार आहे.
जसे मी म्हटले होते की , धनंजयमुंडे त्यांचे मंत्रिपद गमावतील तसेच झाले आता पुढील सहा महिन्यात त्यांना आमदारकी गमवावी लागणार आहे. त्यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे.