जून 2023 ,मध्ये आरोपी राजीव यांच्या दुकानात आला आणि नवीन खाते उघडण्यास सांगितले. त्या खात्यात दररोज 2000 रुपये जमा करण्याचे ठरले. नंतर राहुल काटे नावाचा एजन्ट येऊन पैसे घेऊन जायचा आणि शिक्का लावायचा. राजीवच्या खात्यात 16 जून ते 23 डिसेंबर 2023पर्यंत क्रेडिट संस्थेत 2.32 लाख जमा केले.
मुलीच्या शाळेची फी जमा करण्यासाठी राजीव 2024 मध्ये पैसे काढण्यासाठी पतसंस्थाच्या कार्यालयात गेल्यावर संस्था सध्या तोट्यात आहे म्हणून पैसे काढता येणार नाही असे सांगण्यात आले. नंतर आरोपी कडे पैसे मागितल्यावर त्यांनी बहाणे करून पैसे देण्यास नकार दिला. अखेर राजीव यांनी पोलिसांकडे धाव घेतली. भद्रे दाम्पत्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.