रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला. रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास, इंधनाने भरलेल्या मालगाडीच्या सुरुवातीच्या डब्यातून आगीची ठिणगी निघाली आणि त्यातून ज्वलनशील पदार्थांचा कारंजा बाहेर पडला.
स्फोटासारख्या आवाजानंतर, कारंज्यातून निघालेला इंधनाचा फवारा फलाट क्रमांक 1 वर उभ्या असलेल्या हैदराबाद-दिल्ली तेलंगणा एक्सप्रेसकडेही गेला. यामुळे स्टेशनवर काही काळ गोंधळ उडाला आणि प्रवाशांना मोठा अपघात होण्याची भीती वाटली. काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत तेलंगणा एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीला जोडलेला टँकर इंधन घेऊन रतलाम जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील तडाली येथे जात असताना नागपूर रेल्वे स्थानकावर आग लागल्याचे समोर आले. ही माहिती मिळतातच रेल्वे अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यावेळी फलाटावर तेलंगणा एक्सप्रेस उभी होती. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळण्याने ही आग मालगाडीच्या टँकर पर्यंत पोहोचली नाही आणि मोठा अनर्थ टळला.