मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी, उत्तर काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमधील नौशेरा नॉर्डजवळ नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने उधळून लावला, त्यानंतर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर सतर्क सैनिकांनी त्यांना रोखले. त्यानंतर, गोळीबारात दोन्ही घुसखोर ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची आणि त्यांच्या गटाची ओळख अद्याप पटलेली नाही. आणखी घुसखोर असण्याची शक्यता नाकारण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे.