काँग्रेसच्या नेत्यांनी पटोलेंना रंगेहाथ पकडले, वंचितचा मोठा गौप्यस्फोट

शनिवार, 6 एप्रिल 2024 (09:45 IST)
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पण वंचितकडून त्यात अडथळे आणले गेले.नाना पटोले माईंड गेम करतो असा आरोप केला, टॉर्चर केले, अपमान केला गेला, असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.
 
यावर वंचितने मोठा गौप्यस्फोट केला आहे. वंचितने वेगळी भूमिका घेतली. पण, वैयक्तिक अपमानापेक्षा देशाचे संविधान व लोकशाही महत्वाचे आहे, असे पटोलेंनी अकोल्यात म्हटले होते.
 
बाळासाहेब मी तुमच्या अकोल्यात येऊन सांगतो अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, एक जागा की दोन जागा पाहिजेत. नाना पटोले आपल्या जबाबदारीवर देईल. पण, महाराष्ट्रामध्ये मत विभाजन होऊन देशाला बर्बाद करणारी भाजप निवडून नाही आली पाहिजे, अनुयायी म्हणून मी या ठिकाणी स्विकारतो आहे. अर्ज मागे घेण्यापर्यंत वाट आहे, आमचा प्रस्ताव मान्य असेल तर नाना पटोले निर्णय घेईल, अशीही ऑफर नाना पटोलेंनी दिली होती.
 
यावर वंचितने प्रत्यूत्तर दिले आहे. नाना पटोले तुम्हाला संविधान वाचवायचेच होते तर आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पुंडकर यांना मविआच्या बैठकीत दीड तास बाहेर का बसवून ठेवले, ते सांगावे, असे आव्हान वंचितने दिले आहे.
 
काँग्रेस आणि आमच्या संबंधांत फूट पाडण्याचे काम करताना जेव्हा तुम्हाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पकडले, त्या दिवसापासून काँग्रेसकडून मविआच्या बैठकांना बाळासाहेब थोरात का येऊ लागले? तुम्ही हे देखील अकोला वासियांना सांगावे, असा गौप्यस्फोट वंचितने करत आव्हान दिले आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती