वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताना 11 उमेदवारांना संधी दिली आहे. हिंगोलीतून बी. डी. चव्हाण, लातूरमधून नरसिंग उदगीकर, सोलापूरमधून राहुल गायकवाड, माढातून रमेश बारस्कर, साताऱ्यातून मारुती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकंगलेमधून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय ब्रह्मणे, जालनातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्यमधून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग काका जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांपैकी आतापर्यंत 19 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. याआधी वंचितने भंडारा-गोंदियातून संजय गजानन केवट, गडचिरोली-चिमूरमधून हितेश पांडूरंग मडावी, चंद्रपूरमधून राजेश वारलूजी बेले, बुलढाण्यातून वसंत मगर, अकोल्यातून प्रकाश आंबेडकर स्वत:, वर्धामधून राजेंद्र साळुंखे, अमरावतीतून प्राजक्ता पिल्लेवान आणि यवतमाळ-वाशिममधून खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर वंचितने नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आणि कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे.