काँग्रेसने अखेर विरोधी पक्षनेतेपदासाठी 'या' नेत्याला दिली संधी

बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (07:27 IST)
राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार पक्षातील आमदारांसह सत्तेत सामील झाले. यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याआधी अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. मात्र ते सरकारमध्ये सामील झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे.
 
पदावर संख्याबळानुसार काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद गेलं होतं. मात्र अधिवेशन सुरू होऊन काही दिवस झाले तरीही काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले नाही. अशातच काँग्रेसने विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे. राज्यात विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.
 
विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकमांडला  कळवला आहे.या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या ३  नेत्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडने अचानक वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती