केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला आहे. या मध्ये संगमेश्वर राजवाड्याचा देखील समावेश आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांना विश्वासघाताने ताब्यात घेतले होते. या किल्ल्याचा ताबा राज्य सरकार घेऊन त्याचा विकास करणार आहे.
सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. बजरंगदल आणि विश्वहिंदू परिषद आक्रमक झाले असून राज्यातून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. या साठी विहिंप आणि बजरंगदलच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हादंडाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या कबरी जवळ कोणी जाऊ नये या साठी त्याच्या भोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.