पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा जवळजवळ अंतिम झाला आहे. 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच भागवत यांच्यासोबत व्यासपीठावर येणार आहेत.
माधव नेत्रालयाची नवीन इमारत हिंगणा रोडवरील वासुदेव नगर मेट्रो स्टेशनजवळ 6.8 एकर जागेवर प्रस्तावित आहे. उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोविंद गिरी महाराज, अवधेशानंद महाराज उपस्थित राहणार आहेत.