नागपूर : '११ कोटी द्या नाहीतर तुमचे रुग्णालय उडवून देऊ', डॉक्टरला धमकी
डॉक्टर यांनी या संदेशाला प्रतिसाद दिला नाही. यामुळे आरोपी संतापला. त्याने गॅस सिलिंडरने भरलेल्या वाहनाने रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली. डॉक्टर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. व पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.